Wednesday, July 1, 2020

Be The Richest Person On The Earth

This is a story when I was a bachelor, a hostelite. I was searching for the mess which could give me a lunch tiffin. Somebody told me to contact one elderly lady who was interested in providing lunch tiffins to bachelors. I immediately reached out to her.

I still remember the kind face of that lady, a slightly dark face with very good features. She was draped in a  nine yard pastel coloured saree. In Marathi we call an elderly lady ‘Aajji’ for grandmother. She agreed to provide me a tiffin every day at 7.30am. Aajji told me about herself -she was a retired teacher, living alone. She had three married children who were living in the same city. She could have been around 60-65 years of age. I asked her if she would be able to make the tiffin. She told me she was in the habit of waking up early to make food.

Every Sunday she would give me a feast as per the guidelines of mess. I used to tell her that I like normal food even on Sunday considering her age and the efforts.

I now don’t remember for how long I ate Aajji’s tiffin. In between, Aajji needed to travel to one of her relatives for a long stay, so she asked me to search for another mess. Though I started to buy my tiffin from another mess, whenever I used to see Aajji, we used to talk fondly.

Years passed, I got married and settled down in another part of the city. One day, while reading the newspaper I came across a news article of an elderly lady who died, burnt by flames while cooking. When I read the name of the lady, I came to know it was Aajji who used to give me a tiffin. She was not well because of diabetes. With tears in my eyes, I read the whole news and paid my heartfelt tribute to her.

She must have made food all her life for her children. Why did she not get personal care when she was not able to look after herself, was the thought that plagued me! This thought stayed with me for many days. Whenever I come across the words ‘generation gap’, ‘communication gap’ , ‘elders being adamant’,’ youngsters want space’, I still think that one should not leave their elderly parents alone without care when they require it the most. 

Do ask your elderly parents where they require any help. Love your elderly parents as much as you care for your children. If your partner supports you in this work, it is better, even if you don't get your spouse's support, your parents is your responsibility, you should  take this responsibility happily.When parents are most in need, they should not be left unattended.

Though you are a daughter or a son, take care of your elderly parents, have chats with them, understand them, teach them modern things,respect and love them. When you do this, you will feel like the richest person on the earth…really…believe me!

Marathi Translation (मराठी अनुवाद )👇

पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती बना

मी बॅचलर असतानाची, हॉस्टेल मध्ये राहत असतानाची ही गोष्ट आहे. मी खानावळ शोधत होते कि  जे मला दुपारच्या जेवणासाठी डबा  देऊ शकेल. कोणीतरी मला सांगितले की एक आज्जीबाई आहेत, त्यांना डबा देण्यास आवडेल.मी ताबडतोब त्यांच्याकडे गेले .

मला अजूनही त्या आजींचा चेहरा आठवतो. रेखीव सावळा,दयाळू चेहरा, नऊवारातील सुंदर फिक्कट  रंगाची साडी. खूप छान  व्यक्तिमत्व होते . दररोज सकाळी 7.30 वाजता मला डबा देण्याचे त्यांनी मान्य केले. आजीने  मला त्यांच्याबद्दल  सांगितले. त्या  निवृत्त शिक्षिका होत्या , एकट्याच  राहत होत्या . त्यांचे  तीन विवाहित मूले  होते जे त्याच  शहरात राहत होते. त्यांचे वय 60-65 च्या आसपास असेल , मी त्यांना  विचारले की त्या खरेच मला वेळेत डबा देऊ शकतील   का? त्यांनी  मला सांगितले की त्यांना लवकर उठून स्वयंपाक करण्याची सवय आहे.

दर रविवारी त्या  इतर मेस  प्रमाणेच  मला मेजवानीचा डबा द्यायच्या . मी त्यांना म्हणायचे कि मला रविवारी मेजवानी नसली तरी चालेल. त्यांचे   वय आणि कष्टांचा विचार माझ्या  मनात यायचा .

मला आता आठवत नाही की मी किती काळ आजींकडून डबा घेतला . एकदा खूप दिवसांसाठी  नातेवाईकाकडे जात असल्याने त्यांनी  मला इतर खानावळ   शोधण्यास सांगितले. मी इतर खानावळीतून  डबा  घ्यायला सुरूवात केली असली तरी, नंतर जेव्हा जेव्हा मला आजी दिसायच्या   तेव्हा आम्ही प्रेमळपणे बोलायचो.

नंतर काही वर्ष उलटली , माझे लग्न झाल्यावर ,त्याच  शहराच्या दुसऱ्या  भागात मी स्थायिक झाले . एक दिवस वृत्तपत्र वाचत असताना ' वृद्धेचा  स्वयंपाक करताना आग लागून मृत्यू ' अशी बातमी वाचण्यात आली . जेव्हा मी नाव वाचले तेव्हा मला समजले  की त्या मला डबा  देणाऱ्या आजीचं होत्या. मधुमेह असल्यामुळे त्यांची  तब्येत ठीक नव्हतीअश्रुपूर्ण डोळ्यांनी मी ती बातमी वाचली आणि  त्यांना मनोमन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली .

आजींनी  एक आई म्हणून, त्यांच्या  मुलांसाठी  आयुष्यभर जेवण तयार केले असेल, जीवापाड काळजी घेऊन मुले वाढवली असतील. पण जेव्हा त्या स्वत: ची देखभाल करण्यास सक्षम नव्हत्या  तेव्हा त्यांना  वैयक्तिक काळजी का मिळाली नाही? या प्रश्नाने  बरेच दिवस माझ्या मनात घर केले . 

जेव्हा जेव्हा मी  ‘दोन पिढीतील अंतर’,’ संवादाचे अंतर’, ‘आग्रही वडीलधारी माणसे’, ‘तरुणांना त्यांची स्पेस हवी ‘,  असे शब्द ऐकत असते , तेव्हाही मला असे वाटते की उतार वयात आई-वडिलाना कदापिही एकटे सोडू नये. त्यांची रोज चौकशी करावी, ज्या ज्या गोष्टी त्यांना करायला त्रास होतोय, तिथे त्यांना मदत करावी. आपल्या लहान मुलांना सांभाळतो तशी त्यांच्यावर मायेची पाखर घालावी. त्यांना आदर द्यावा .आपला जोडीदाराने या कामात आपल्याला साथ दिली तर उत्तमच , नाही दिली तरी आपले आई वडील हि आपली जबाबदारी असते .त्यामुळे आपणच हा वसा आनंदाने उचलावा. आई-वडिलांना सर्वात जास्त गरज असते तेव्हा त्यांची काळजी घेतल्याशिवाय राहू नये.

आपण मुलगी असू दे  किंवा मुलगा , आपल्या वृद्ध आई -वडिलांची काळजी घ्या, त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांना समजून घ्या, त्यांना या काळातील गोष्टी शिकवा, त्यांच्यावर प्रेम करा. जेव्हा आपण हे कराल तेव्हा आपल्याला पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाल्यासारखे वाटेल ….... खरंच.. विश्वास ठेवा!

तुमचा अभिप्राय नक्की पाठवा : email id :preetiraskar@gmail.com