Sunday, November 1, 2020

Live life like the wind!

A few tragic incidents that occurred in the recent past and within a short span, left a very deep impact on me. The first incident was the suicide of a young girl studying in the tenth standard. She committed suicide in spite of scoring excellent marks, just because she scored less than her friend! The second incident was the suicide of a reputed industrialist due to recession and losses incurred during the Covid-19 outbreak. As it is, the news of suicides of farmers and protesters fills my mind with sadness, these incidents made me even sadder!

The first case of the girl who committed suicide even after getting 88% marks is heart-wrenching! Such extreme competition, so much stress! What did she accomplish by putting an end to her own life and causing great sorrow to her near and dear ones?

Perhaps, this girl would have been successful later in her life. She would have made a valuable contribution to her family and society. Unfortunately, she couldn’t resist the negative emotions of envy and comparison and her life became a misery! The poor girl was clueless that a decision taken in a negative frame of mind is NEVER the right decision!

I think this is where ‘value education’ comes in. Life will never be enriched by inculcating fear, revenge, greed, jealousy, hatred and competition. Nowadays, some schools do not openly disclose a student’s test scores in order to avoid unnecessary comparison. The schools also counsel young parents to avoid comparison. Going a step further, parents encourage their child to not compare their results with anyone, but to work hard and better their own scores. This is certainly a welcome change, hope that it percolates everywhere!

I would like to quote examples from Mahabharata- when the Kauravas and the Pandavas were preparing for battle, Duryodhan told his siblings, “Prepare such that you will be superior to the Pandavas”, whereas Yudhisthir told his siblings, “Prepare with all your might and concentration, the journey of preparation is more important than the result”.

The epic Mahabharata with its multitude events, the fractured relationships due to the immense hunger of the Kauravas for wealth and power, the unsuccessful life of a virtuous mother like Gandhari, what does all of this teach us? There is so much to learn from mythology!

The second incident of an industrialist who committed suicide due to recession, he who had created his business from scratch, fills me with deep sorrow! With millions of people dying from Covid, isn't it a blessing that we have survived? 'सिर सलामत तो पगडी पचास ! There is a wave of recession, industries are shutting down. In order to survive economically, some businesses had to be closed, extra costs had to be cut, austerity had to be practised. Many of us had to write off a few years of progress.

Why should the one who had created his world from scratch be afraid to begin all over again? If the brand had already evolved, would it be so difficult for it to stand up again?  Should the one who has faced hardship before, be afraid to face hardship again?

In one of Birbal's stories, three questions have the same answer:

- Why did the roti burn? - Because it was not flipped.

- Why did the horse stumble? - Because it was not flipped.

- Why did the leaf rot? - Because it was not flipped.

Likewise, the immediate cause of both these suicides that comes to mind could be that they did not express or share their feelings.

Why don't you express yourself?

Why don't you tell someone your grief? Is it because you feel insecure? Does a thought cross your mind, “What will others think? Will they may make fun of me, consider me weak, won’t understand me or take advantage of my vulnerabilities later?”

So how do you lessen the burden of your grief?  It is very simple:

·         Share your feelings with any friend who is willing to listen to you. Cultivate at least one person in your life with whom you can share your happiness and sorrow. Approach a positive thinker or a motivational person for advice or sharing.

 ·         When you share your grief and vent your emotions, you feel less burdened. Also, sharing your feeling with others may offer some solutions.

 ·         Anger, jealousy, hatred, malice, revenge, laziness, sorrow, loneliness, fear etc. are negative emotions. No important decision should be made with these feelings ruling your mind. Decisions made with negative emotions uppermost in your thoughts never lead to respect in society or happiness in life.

 ·         Important decisions should always be made with a calm and positive mind.

 ·          Love, purity, respect, happiness, hope, curiosity, enthusiasm, gratitude, forgiveness etc. are all positive emotions.

 ·         Every person is different in his own way, be it in personality or constitution, hence there shall be no place for comparison and jealousy. Avoid going to places or being in situations where you are constantly insulted or belittled. Every relationship contributes something to our lives, respecting the other is a given!

 ·         Positive thoughts and positive emotions result in positive efforts and automatically life becomes very positive.

 ·        By doing Pranayama, meditation, we can deal with any situation very successfully. This is a scientifically proven fact. Since Pranayama increases the level of oxygen in our body, we start thinking positively. Big companies train their executives with Pranayama and meditation, because it betters decision making abilities and increases positivity. (*)

Foreigners travel to India to learn Pranayama. Industrialists, famous artists, athletes, public leaders practise Pranayama, then why don't we, ordinary people, learn / practise this divine knowledge which is native to our own country?

Finally, inspired by Kusumagraj's poetry, I would like to present the following poem:


No greed, no envy,

No fear, no revenge.

Stand strong like a tiger,

And fight like a fighter.


Constant comparison and anger, will that develop life?

Forest fires, smouldering fires, will a sapling survive?

With negativity, you will cry away your whole life like Ashwatthama.

So, kick the fear, don't be engulfed in depression,

As happiness is transient, will sorrow remain constant?


So, 'Please do wake up, it's not too late',

 Hiding behind anger, don’t play a game of lust.


Life is a journey, of happiness and misery,

Life is a whirlwind of defeat and victory.


Live life like the wind, which follows its own path,

Follow your dreams and reach for the sky.

Don’t get lost in the fog of dejection,
Don't extinguish life in addiction.

Leave aside negative advice,

Fight on your own, conquer all the negative feelings.

Burn the poison in your mind,

Live life like the wind.

----------------------------------------------------------

* This icon shows the following references :

https://www.artofliving.org/in-en/wisdom/emotion

https://www.artofliving.org/in-en/wisdom/knowledge-sheets/5-secrets-to-happiness

References:

Ashwatthama – A character from Mahabharata who had the boon of immortality, but was cursed to lead a life of suffering with painful wounds after the epic war.

Acknowledgements:

Thank you my parents Aai , Papa, for being light of my life!

Thank you my daughter Tanisha and husband Avinash for listening my fresh drafts patiently and  giving feedbacks.

 I am thankful to my beloved friend Prachi Karnik for her valuable guidance and checking and rewording english drafts sometimes on short notice!

Thanks a lot, to people who read, your encouragement keeps me going ahead!

--------------------------------------------------------------------------------------------

Marathi Translation (मराठी अनुवाद )👇


आयुष्य जग वाऱ्यासारखं सर्वव्यापी असलेलं!

अगदी थोड्या अंतराने घडलेल्या या घटनांनी मला अस्वस्थ केले. पहिली  घटना - दहावीच्या निकालानंतर उत्तम गुण पडूनही , मैत्रिणीपेक्षा कमी गुण मिळाले म्हणून आत्महत्या करणाऱ्या मुलीची  आणि दुसरी  घटना एका प्रथितयश उद्योगपतीची  जगव्यापी करोना आजारामूळे, आलेल्या मंदीमुळे केलेली आत्महत्त्या . शेतकऱ्यांच्या , आंदोलकांच्या आत्महत्यांच्या नेहमीच येणाऱ्या बातमीने तर  मन दुःखाने भरून जाते.

पहिली घटना- वर्षभर चांगला अभ्यास करून ८८% गुण मिळवूनही , केवळ मैत्रिणीपेक्षा कमी गुण मिळाले म्हणून आत्महत्या करणाऱ्या मुलीची. इतकी टोकाची स्पर्धा - इतका ताण !, आई वडिलांना , नातेवाईकांना अतोनात दुःख देऊन, स्वतःचेच आयुष्य संपवून तिने काय साधले ? कदाचित हि मुलगी पुढे खूप समर्थपणे पायावर उभी राहिली असती . आपल्या कुटुंबासाठी , परिवारासाठी आणि समाजासाठी तिने मोलाचे योगदान दिले असते . पण तात्पुरत्या भावनांच्या आवेगाला ती थांबवू शकली नाही.  ज्या तुलनेमुळे, हेव्यामुळे ,जीवन खरे तर नरक बनते तेच तिने महत्वाचे मानले . चुकीच्या किंवा नकारात्मक कारणांसाठी घेतलेला निर्णय कध्धीच  बरोबर नसतो हे तिला बिचारीला माहीतच नसावे .

मला वाटते इथेच मूल्य शिक्षण येते. भीती , सूड , लोभ , मत्सर , द्वेष आणि स्पर्धा शिकवणारे शिक्षण कधीही जीवन घडवत नाहीत . आज काही शाळांमध्ये ही जाणीव ठेवून परीक्षेचे गुण उघडपणे सगळ्यांना सांगत नाहीत. मुले लहान असतांना, पालकांचेही समुपदेशन केले जाते . मग ते हि आयुष्यभर 'याच्यापेक्षा  किंवा याच्यासारखे चांगले गुण मिळव असे न सांगता, तुझे गुण पुढच्या परीक्षेला, ‘आहे त्यापेक्षा’ वाढवं’, असेच सांगतात . हा बदल नक्कीच खूप स्वागतार्ह आहे फक्त तो सर्व शाळांमध्ये पोहोचायला हवा.

मला अशा वेळी महाभारताचा दाखला द्यावासा वाटतो , कौरव आणि पांडव यांच्या स्पर्धेची तयारी चालू असतांना,  दुर्योधन आपल्या भावंडांना सांगतो ,' तुम्ही पांडवांपेक्षा वरचढ व्हाल अशी तयारी करा'., तर युधिष्ठिर  आपल्या भावंडांना सांगतो, ' तुम्ही सर्वोत्तम अशी तयारी करा, आपण तयारी किती न्यायाने आणि एकाग्रतेने करतो ते महत्वाचे , तो प्रवास महत्वाचा'.

महाभारत हा ग्रंथ , त्यातील घटना , कौरवांनी सत्ता आणि संपत्तीच्या हव्यासापोटी केलेला नात्यांचा छेद , गांधारीसारख्या पुण्यशील मातेचे अपयशी जीवन काय शिकवते? आपण आपल्याच इतिहासातून, पौराणिक कथांतून का काही शिकत नाही?

दुसरी घटना - मंदीमुळे आत्महत्या केलेल्या एका उद्योगपतीची , ज्याने शुन्यातून जग निर्माण केले होते.  करोना आजारामुळे लाखो माणसांचा मृत्यू होत असतांना , आपण जिवंत राहिलो हे महत्वाचे नाही का? 'सिर सलामत तो पगडी पचास ! मंदीची लाट आहे, उद्योग बंद पडत आहेत . फार फार तर काय होईल, काही गोष्टी बंद कराव्या लागतील , जास्तीचे खर्च कपात करून , काटकसर करावी लागेल. काही प्रगतीची  वर्षे परत मागे जाऊ.

 ज्याने शून्यातून जग निर्माण केले त्याने शून्याला का घाबरावे? जर ब्रँड विकसित झाला आहे तर , पुन्हा उभे राहायला असे किती वर्षे लागली असती ? ज्याने कष्टाचे बिल्ले बाहीवर मिरवले आहेत, त्याने कष्टालाच घाबरावे ?

बिरबलाच्या  एका गोष्टीच्या कोड्यात, तीन प्रश्नांचे एकच उत्तर दिले आहे :

- पोळी का जळाली - कारण फिरवली नाही.

-घोडा का अडला-कारण फिरवला नाही .

-पाने का सडली- कारण फिरवली नाही .

तसे या दोन्ही घटनांचे तात्कालिक कारणही एकच आहे, ‘ ते व्यक्त झाले नाहीत’.

का व्यक्त होत नाही आपण ?

आपण आपले दुःख का कोणाला सांगत नाही कारण आपल्याला असुरक्षित वाटते. म्हणजे असे वाटते कि  समोरचा काय विचार करेल? कदाचित आपली चेष्टा करतील, कमकुवत मानतील, कमी समजतील किंवा नंतर फायदा उठवतील .

मग कसे कोणाला आपले दुःख  सांगायचे? खूप सोपे आहे:

·         तुमचे सुख-दुःख जो ऐकू शकतो अशा , सकारात्मक विचार असलेल्या तुमच्या कोणत्याही मित्र किंवा मैत्रिणीला तुम्ही तुमचे दुःख सांगू शकता. आयष्यात एक माणूस तरी असा कमवा कि तुम्ही त्याला सर्व सुख-दुःख  सांगू शकाल. जो जास्तीत जास्त सकारात्मक विचार करतो तो माणूस सल्ला देण्यास योग्य समजावा.

 ·         सहन करण्यापेक्षा, दुःख सांगितल्याने ते कमी  होते , बऱ्याचदा त्यातून मार्गही निघतो .

 ·         राग , मत्सर ,द्वेष ,खुन्नस , सूड ,आळस ,दुःख ,एकटेपणा ,भीती इ. नकारात्मक भावना आहेत. आपल्या मनात या भावना असतांना कोणताही महत्वाचा  निर्णय घेऊ नये. नकारात्मक भावनेने घेतलेले निर्णय कधीही समाजात सन्मान किंवा जीवनात आनंद देत नाहीत.

 ·         महत्वाचे निर्णय नेहमी ,मन शांत आणि सकारात्मक असतांना, सारासार विचार करून घ्यावेत.

 ·         प्रेम, निर्मळपणा,आदर ,आनंद,आशा , उत्सुकता, उत्साह, कृतज्ञता,क्षमा या सकारात्मक भावना आहेत.

 ·         प्रत्येक माणूस वेगळा असतो , त्याचे व्यक्तिमत्व , त्याची जडण -घडण वेगळी असते , असा विचार केल्यास,तुलना आणि मत्सर येतच नाही . पण तरीही जिथे सर्वथा अपमान होतो , अवहेलना होते, टोकाची तुलना असते , तिथे परिस्थिती सुधारे पर्यंत नका जाऊ . प्रत्येक नात्याचे आपल्या आयुष्यात काहीतरी योगदान असते , एकमेकांविषयी आदर हा हवाच .

 ·         सकारात्मक विचार सतत मनात येत असतील तर आपल्याकडून सकारात्मक काम होते आणि आपोआप जीवन अतिशय सुंदर सकारात्मक होते .

 ·         प्राणायाम, ध्यान  या गोष्टी केल्याने आपण कोणत्याही प्रसंगाला अतिशय यशस्वीपणे सामोरे जाऊ शकतो . हे टेक्निकली (तांत्रिकदृष्ट्या) सिद्ध झाले आहे .कारण प्राणायामने आपल्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, आपण जास्तीत जास्त पॉजिटिव्हली (सकारात्मक) विचार करू लागतो. मोठमोठ्या कंपन्या आपल्या अधिकाऱ्यांना प्राणायाम , ध्यान याचे  प्रशिक्षण देतात कारण त्याने निर्णयक्षमता वाढते,सकारात्मकता वाढते . (*)

 परदेशी लोक आपल्या देशात  येऊन प्राणायाम शिकतात. उद्योगपती, प्रसिद्ध  कलाकार, खेळाडू, लोकनेते  प्राणायाम करतात , मग आपल्याच देशातले हे दिव्य ज्ञान -प्राणायाम , ध्यानधारणा , योगासने आपण सामान्य  लोकांनी का  नाही शिकायचे आणि करायचे ?

शेवटी, कुसुमाग्रजांच्या कवितेतून प्रेरित होऊन , मला खालील कविता सादर करायला आवडेल :

 

नको लोभ, नको हेवा,

नको भीती, नको सूड.

वाघासारखा हिंमतीने  उभा राहा,

संकटाच्या नजरेत एकदा नजर बांधून पहा .

 

याच्याशी तुलना,त्याच्यावर राग, आयुष्य घडवतील काय?

वनातील वणवा, धुमसणारी आग, रोपटे जगवतील काय ?

अश्वत्थाम्यासारखा बसशील आयुष्यभर रडत,

भीतीला घाल लाथ, नको बसू झुरत ,

सुख गेले तसे, दुःख तरी राहील काय?

 

म्हणून म्हणते , 'जागे व्हा, अजून गेली नाही वेळ,

रागाच्या मागे लपून, नको हव्यासाचा खेळ.

 

आयुष्य म्हणजे प्रवास, सुख-दुःखाच्या वळणाचा .

आयुष्य म्हणजे श्रावण मास, यश-अपयशाच्या ऊन-पावसाचा.

 

आयुष्य जग वाऱ्यासारखं, सर्वव्यापी असलेलं .

पाण्याचीही वाफ होऊन, नभापर्यंत पोहोचलेलं .

 

निराशेच्या धुक्यामध्ये हरवू नकोस.

व्यसनाच्या जंजाळात आयुष्य विझवू नकोस .

 

नकारात्मक उपदेश तू उधळून लाव,

स्वतःशीच लढ , ठोकरून सारे डाव .

 

जाळून टाक किल्मिष सारं मनामध्ये साचलेलं ,

आयुष्य जग वाऱ्यासारखं सर्वव्यापी असलेलं .

 

* हे चिन्ह खालील संदर्भ  दाखवते , नक्की वाचा :

https://www.artofliving.org/in-mr/wisdom/dealing-with-emotions

https://www.artofliving.org/in-mr/wisdom/five-secrets-of-success

या ब्लॉगची ऑडियो क्लिप ऐकण्यासाठी खालील लिंक वर जा:

https://soundcloud.com/preeti-raskar/p26dmfcjp9cw


 

Thursday, October 1, 2020

Check the tyres

I was deputed to one of the plant constructions sites in Turkey for instrumentation erection and commissioning of the plant in 2006-07. This was one of the projects using a special technology which was engineered by me as a lead engineer.

At that time, we had got thirty days at a time stay on the Turkish visa. So, after every 30 days I used to come back to India for a week, renew my visa and then go back to site. The plant site was 1.5-2 hours away from Konya city. So, my return travel was Plant site Cumara to Konya by car, and Konya-Istanbul-Mumbai by aeroplane.

To catch a flight at 10 am in the morning, we started at 7 am. The roads were excellent, the car was in good condition and was running at a speed of 180-200km/hr. This was the normal speed there. Around 8am our car just crossed a fly over, and within a second one of the car’s tyres burst. The car was in great speed at that time. Adjoining the road, there was an empty field. The driver was quite experienced, and he steered the speeding car into the empty field. The driver did not leave the steering, kept it moving in whichever way possible. There were huge jerks and bumps with speed, we were shouting and crying in the car. At that time, I remembered my 3 year old daughter. When the car finally stopped, the thought that flashed through my mind was that my daughter would be left motherless if I had died. We were shaken with the thought that WHAT if this would have happened a minute before when the car was on the fly over!

We got down from the car and could see only the rim of the wheel, the tyre had been completely burnt away! After this, it was an adventure to catch the flight on time. My fellow colleagues helped me a lot till I got into the flight.

So, accident- root cause analysis- lesson learnt…I took it as an engineering lesson.

Hence, I would like to conclude with the following dos and don’ts:

Before you start your car travel, always check whether there is adequate air pressure in the tyres (every tyre has guidelines of min-max air pressure, the measurement gauge shall show accurate readings), tyre condition (life), road condition (i.e. less speed on gravel/wet road) and accordingly decide the vehicle speed. Wheel alignment, tyre rotation, replacing old tyres are necessary things required to be done by the car owner.

Life has its ups and downs, but life is beautiful!

Let us live it fully, safely, taking care of all the possible risks.         

Marathi Translation (मराठी अनुवाद )👇

टायर्स तपासा.

मला २००६-०७ मध्ये इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी उभारणीसाठी आणि संयंत्र निर्मितीसाठी तुर्कीतील एका प्लांट कन्स्ट्रक्शन साइटवर नियुक्त केले गेले. हा एक विशेष तंत्रज्ञान असलेला प्रकल्प होता, मी त्या प्रोजेक्टवर लीड इंजिनीअर म्हणून काम केले होते .

त्या वेळी आम्हाला तुर्की व्हिसावर एका वेळी ३० दिवस मुक्काम मिळत होता. दर ३० दिवसानंतर मी आठवडाभरासाठो भारतात परत यायचे, मुक्काम नूतनीकरण करून साइटवर परत जायचे.

कोनया नावाच्या शहरापासून १.५ – २ तासांच्या अंतरावर प्लांट साइट होती. म्हणून माझा परतीचा प्रवास प्लांट साइट कुमरा ते कोनया कारने, कोनया-इस्तंबुल-मुंबई विमानाने असा असायचा.

सकाळी दहा वाजताचे विमान होते, आम्ही सकाळी सात वाजता विमानतळावर जाण्यासाठी निघालो. रस्ते उत्तम होते, गाडी उत्तम होती, १८० – २०० किमी / ताशी वेगाने चालली होती. तिथे हा वेग सामान्य होता. सकाळी आठच्या सुमारास आमच्या कारने फ्लाय ओव्हर ओलांडला आणि एका सेकंदात कारचा एक पुढचा टायर फुटला. रस्त्याच्या कडेला एक रिकामे शेत होते. टायर फुटतांना कार रस्त्याच्या कडेला असलेल्या रिकाम्या शेतात शिरली. आमच्या ड्रायव्हरने कारचे स्टेअरिंग सोडले नाही, तो कोणत्याही प्रकारे ते फिरवत राहिला. कार ड्रायव्हर खूप अनुभवी  होता. कार वेगात होती, धक्के खात होती. आम्ही कारमध्ये ओरडत, किंचाळत होतो.

जेव्हा गाडी थांबली आणि आम्ही कारमधून खाली उतरलो, पाहतो तर काय, कारच्या टायरच्या चिंधड्या होऊन तिथे टायर चे नामोनिशान नव्हते ,फक्त रिम होती. गाडी फ्लाय ओव्हर ब्रिजवर असताना एक मिनिट आधी असे घडले असते तर आमचे काय झाले असते या विचाराने आमचा थरकाप उडाला. त्यावेळी मला माझ्या 3 वर्षाच्या मुलीचा चेहरा डोळ्यासमोर आला. गाडी थांबल्यावर, जेव्हा थरथरणाऱ्या पायांनी आम्ही खाली उतरलो आणि समोरच्या फ्लाय ओव्हर ब्रिजकडे पाहत माझ्या तोंडातून वाक्य बाहेर पडले, ‘मी गेले असते  तर माझ्या मुलीला आई राहिली नसती’.

यानंतर विमान पकडणे हे एक साहस होते. मी विमानात  बसेपर्यंत माझ्या सहकाऱ्यांनी मला खूप मदत केली.

मी हि घटना एक अभियांत्रिकी धडा म्हणून घेतली. आणि झालेली घटना - तिचे मूळ कारण शोधणे -त्यातून धडा शिकणे, यातून टायर फुटू नये म्हणून काय काळजी घ्यावी हे शिकले.

म्हणून या अनुभवातून, टायर्स फुटू नये म्हणून, मला खालील 'काय करावे ' आणि 'काय करू नये ' हे सांगायला आवडेल:

 कारचा प्रवास सुरू करण्यापूर्वी टायरमध्ये योग्य हवेचा दाब आहे की नाही ते तपासा (प्रत्येक प्रकारच्या  टायरसाठी  किमान(कमीत कमी )- कमाल (जास्तीत जास्त) हवेच्या दाबाच्या मार्गदर्शक सूचना असतात, मोजणारा प्रेशर गेज हि अचूक पाहिजे, टायरची स्थिती (लाईफ), रस्त्याची स्थिती (खडीच्या,ओल्या रस्त्यावर वेग कमी पाहिजे), त्यानुसार वाहनांचा वेग निश्चित करा. चाकाचे अलाइनमेंट, टायर रोटेशन, मुदत संपलेले जुने टायर बदलणे या कारच्या मालकाने अवश्य करण्याच्या गोष्टी आहेत.

आयुष्यात चढ-उतार असतात,परंतु जीवन सुंदर आहे.
 

सर्व संभाव्य धोक्यांची काळजी घेत,आपण हे जीवन पूर्णपणे, सुरक्षितपणे जगू या!

 

           


                    

Tuesday, September 1, 2020

Gurave Namaha:

Whenever the topic of discussion veers to my childhood, my mind always wanders back to the eighties.

In 1987, my father, who was a secondary school teacher, decided to move to his native village of Hangewadi. So, we moved to Kurnewadi, which was a part of Hangewadi village near our farm. That was where my sister began her schooling. At that time, the lone classroom of the Kurnewadi school had only a thatched roof and earthen walls.

Gaikwad Guruji, who used to come from a neighbouring village on a bicycle every morning, would teach classes from the first standard to the fourth standard in that school. He would be dressed in his customary uniform of white pyjamas, shirt, and a Gandhi cap. All the four classes would sit in the lines of their respective classes. Every day Guruji would recite the prayers in a booming voice with the children. Once the prayers were done, he would start with the daily routine-

"First standards, 'Anna Budi' start from 1 to 100."

"Second standards, have you solved yesterday's Maths questions? Start with spellings."

"Third standards, ‘Pahunya’ where is your attention?  Open yesterday’s poem.” (Pahunya implies a guest visiting a family in the village)

In this manner, all four classes would study at the same time. Even though one class had started practising Maths tables, the other class would honestly do what they had been told to do.

When teaching History to the fourth standard, Gaikwad Guruji would bring the glory of the past era to life with his wonderful gestures and voice modulation. This really made the children love the history of Shivaji Maharaj. At such times, even the peasants passing by would linger along the school walls and listen enthralled to these wonderfully gripping stories!

There was a big wooden box in the school. Whenever Guruji touched the box, the children would calm down. This box was full of treasures such as story books, recitation books, tools for geometry and so on. There would be an hour of story-telling every alternate day after 4 pm. This went a long way in developing the children’s interest in reading. The children used to get one storybook at a time for reading.

During the long school breaks, Guruji would conduct team games such as Kho-Kho and Kabaddi. He was very particular about good handwriting. Due to this, my sibling’s handwriting is very good.

Gaikwad Guruji was a strict disciplinarian; he did not like it if his students came late to school or had not done the homework given by him.

Nowadays when there is one teacher for every ten students in our children’s school, we just cannot forget Gaikwad Guruji. Despite being a one-teacher school, he paid close attention to the overall development of all his students. He was an excellent teacher.

Later, my sister became a computer engineer. She worked in world-renowned companies such as Microsoft in Washington and IBM in USA and Canada.

Looking back on this journey, one cannot forget to pay respect and be grateful to Gaikwad Guruji, who strengthened the educational foundation and imparted values.

After the secondary school at taluka place, I started attending 7th grade in the Zilla Parishad’s primary school, which was up to the seventh grade in the tiny Hangewadi village. I had to walk to school in Hangewadi village. There was a dedicated teacher for every class. More Guruji was the teacher for the 7th grade. He always wore clean and ironed shirts and trousers. I came from a taluka high school, so my language and expression were different, but More Guruji never let me feel it. He taught English very well. More Guruji was very patient, he would explain the concepts with reasons, so we would understand it very well.

At that time, there would be a central examination for the 7th standard primary students held in another village. The teachers would take all the children for the exams to the exam centre village and stay there for four days. Other schools from neighbouring villages would also come to the centre. More Guruji had also taken us for the central exam. At that time, the care that he gave us was no less than the care that our own fathers would give us. It was because of More Guruji that I came first in the seventh standard centre in English.

I can never forget any of my gurus - Kadam Bai, who taught us till the fourth grade, Deshmukh Sir who taught English in the fifth grade, Bhor Sir who taught Maths in the sixth grade, Badakh Madam who taught English in the eighth grade, Verma Sir who taught Applied Mechanics in Pravaranagar-Loni college, Principal Advani Sir, Sunita Mhaske Ma’am for Electronics to name a few. When we would bow and greet Kadam bai, she would bless us and say, “May you have a good husband, and get old soon”. At that time, we girls didn’t like that blessing so much. We understood its real meaning only when we grew up where we realized that ‘Get Old Soon’ translated to ‘May you live a long and happy life’. In Applied Mechanics, 90% of the students got more than 90 marks out of 100, this complicated subject was made very easy for us by Verma Sir.

Along with all these teachers (gurus), mother and father are first gurus! I do not have enough words to write about them!

We often performed well in speeches and essays because of our mother. She still has a wealth of words and knowledge in her treasure trove. She can solve any type of Marathi word puzzle and crosswords in no time. She can easily answer the questions in the TV series 'Kaun Banega Crorepati'. She is well versed with Mahabharata, Ramayana, right down to every small detail. She always tries and makes new recipes. She has easily learned to use a smartphone. In a village where 98% of the girls would have child marriages at that time, we were allowed to go out for education because of the power called Mother. Mother's enthusiasm, love of cleanliness, love of learning new things, and perseverance keeps us motivated always.

It was our father who shaped us as human beings, he taught us how to think. He never taught us any of the conventional school subjects at home, but he taught us the subject of life. He used to give us value education while riding back to school on his motorcycle. He would give us 'Quality time', when the word was not even coined, but our father practised it all his life. Even today, when we go home, we are treated to the wealth of his knowledge. He taught us to respect elders, his favourite sayings were - ‘Another’s money is soil’, ‘do not feel ashamed of any type of good work’, ‘do not celebrate by taking out loans’, ‘live with self-respect’ and ‘living rich means living a civilized life’. Even today, in times of happiness and sorrow, his words give us courage. We remain grounded during happy times, and we don’t sink during sad times, our father is the spirituality of our hearts.When we go with our father to visit any of the neighbouring villages, at the taluka place, our hearts are filled to the brim seeing the respect that he gets, and we make a determined promise to carry on his legacy of values.

As Saint Kabir said,

Guru Saman Data Nahi, Yachak Shish saman

Teen lok ki sampada, so guru dinhi daan

This means, there is no giver like the Guru (teacher), and no taker like the disciple. The Guru bestows on his disciples a gift of vast knowledge which is much more valuable than all the wealth of the Universe.

Our lives were shaped because of such dedicated gurus, hundreds of salutations to them!

Marathi Translation (मराठी अनुवाद )👇

गुरवे नमः

आमच्या लहानपणीचा विषय निघाला कि, माझे मन कायम ऐंशीच्या दशकात जाते.

१९८७ साली माझ्या माध्यामिक शिक्षक असलेल्या वडिलांनी मूळ हंगेवाडी या गावी राहण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही आमच्या शेताजवळ असलेल्या वस्तीवर, कुरणेवाडीस राहण्यास आलो. माझ्या बहिणीची शाळा नंतर तिथेच सुरु झाली. तेव्हा कुरणेवाडीच्या शाळेची एकमेव खोली, पेंढ्यांचे छप्पर आणि पांढऱ्या मातीच्या भिंती असलेली होती. रोज सकाळी दुसऱ्या गावाहून, सायकलवर येणारे गायकवाड गुरुजी, त्या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिकवायचे. पांढरा शुभ्र पायजमा, शर्ट आणि गांधी टोपी असा त्यांचा वेष होता. चारही इयत्ता आपापल्या इयत्तेच्या रांगेत बसायच्या. रोज गुरुजी मुलांबरोबर खड्या आवाजात प्रार्थना म्हणायचे. प्रार्थना झाली कि,

 "इयत्ता पहिलीss 'अण्णा बुडी ' १ ते १०० सुरु करा.", 

" दुसरीss कालचे गणितं सोडवली का? शुद्धलेखन सुरु करा",

"तिसरीss - 'पाहुण्या' लक्ष कुठे आहे? कालची कविता काढा ".

असा एक साथ चारही इयत्तांचा अभ्यास चालायचा. एका इयत्तेचे पाढे सुरु असले तरी दुसरी इयत्ता, इमाने इतबारे आपल्याला सांगितलेले करत असायची.

गायकवाड गुरुजी चौथीचा इतिहास शिकवतांना हावभाव करून, आवाजात चढ उतार करून, अगदी तो प्रसंग हुबेहूब मुलांसमोर उभा करायचे. शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना मग भारी आवडायचा. अशा वेळी आजूबाजूने जाणारी शेतकरी माणसेही छपऱ्याच्या भिंतीशेजारी रेंगाळून त्या सुरम्य कथा ऐकायची.

शाळेत एक मोठी लाकडी पेटी होती, तिला गुरुजींनी हात लावला कि मुले शांत व्हायची. त्या पेटीत गोष्टींची पुस्तके, बडबडगाणी असणारी पुस्तके असा बराच खजिना असायचा. गायकवाड गुरुजी खूप गोष्टी सांगायचे. एक दिवसाआड चार वाजल्यानंतर गोष्टीचा तास असायचा. यामुळे मुलांना वाचण्याची आवड निर्माण झाली, त्यांना एकावेळी एक पुस्तक घरी वाचायला देखील मिळायचे. खेळाची सुट्टी झाली कि, ते मुलांचा कधी कबड्डी, कधी खो-खो असे संघटित खेळ घ्यायचे. सुंदर हस्ताक्षरावर त्यांचा फार कटाक्ष असे. माझ्या भावंडांचे अक्षर त्यामुळे सुंदर, सुरेखित आहे.

गायकवाड गुरुजी कडक शिस्तीचे होते, शाळेत येण्यास उशीर झाल्यास, दिलेला अभ्यास न केल्यास, त्यांना आवडायचे नाही. आता आमच्या मुलांच्या शाळेत जेव्हा दहास एक असे शिक्षक असतात, तेव्हा गायकवाड गुरुजींची आठवण आल्याशिवाय राहत नाही. एकशिक्षकी शाळा असूनही आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे त्यांचे फार लक्ष होते. ते अतिशय उत्तम शिक्षक होते.

पुढे माझी बहीण कॉम्पुटर इंजिनिअर झाली, तिने मायक्रोसॉफ्ट वॉशिंग्टन, आय.बी.एम., अशा जग प्रसिद्ध कंपन्यांमध्ये, अमेरिका, कॅनडा इ. देशांमध्ये काम केले/ करत आहे.

या प्रवासात मागे पाहतांना, शैक्षणिक पाया भक्कम करणाऱ्या, नकळत मूल्य शिक्षण देणाऱ्या गायकवाड गुरुजींना मनोमन नमस्कार केल्याशिवाय मन राहवत नाही.

तालुक्याच्या माध्यमिक शाळेतून मी इयत्ता सातवीसाठी, अगदी छोट्याशा खेड्यातल्या, जिल्हा परिषदेच्या सातवीपर्यंत असलेल्या प्राथमिक शाळेत आले होते. त्यासाठी मला पायी हंगेवाडी गावात असलेल्या शाळेत जावे लागायचे, गावातल्या, म्हणजे हंगेवाडीतील शाळेत एका वर्गासाठी एक शिक्षक होते. सातवीसाठी मोरे गुरुजी होते. स्वच्छ इस्त्री केलेला शर्ट पॅन्ट असा त्यांचा वेष असायचा. तालुक्याच्या हायस्कूल मधून मी आलेली, माझी भाषा, व्यक्त होण्याची पद्धत जरी वेगळी होती, तरीही ते त्यांनी मला कधी जाणवू दिले नाही. इंग्रजी ते अगदी उत्तम शिकवायचे. मोरे गुरुजी अतिशय संयमी होते. ते समजावून सांगतांना कारण सांगून समजावयाचे त्यामुळे ते छान समजायचे.  तेव्हा सातवीत केंद्र परीक्षा असायची. परिक्षेसाठी सगळ्या मुलांना घेऊन चार दिवस केंद्र असलेल्या गावी जाऊन शिक्षकांना राहावे लागायचे. केंद्राच्या ठिकाणी आजूबाजूच्या गावातीलही शाळा यायच्या. मोरे गुरुजीही आम्हाला घेऊन गेले होते. तेव्हा त्यांनी आम्हा मुलींची घेतलेली काळजी वडिलांपेक्षा कमी नव्हती. इंग्रजी विषयात मी सातवीला केंद्रात पहिली आले होते ते मोरे गुरुजींमुळेच.

मला चौथीपर्यंत शिकवणाऱ्या कदम बाई, पाचवीत इंग्रजी शिकवणारे देशमुख सर, सहावीला गणित शिकवणारे भोर सर, आठवीत इंग्रजी शिकवणाऱ्या बडाख मॅडम, पुढे प्रवरानगरच्या लोणीला कॉलेजमध्ये अप्लाइड मेकॅनिक्स शिकवणारे वर्मा सर, प्राचार्य अडवाणी सर, इलेक्ट्रॉनिक्स च्या सुनीता म्हस्के मॅडम या गुरुवर्यांना विसरणे शक्य नाही. कदम बाईंना वाकून नमस्कार केला कि त्या 'चांगला नवरा मिळूं दे, लवकर म्हातारी हो ' असा आशिर्वाद द्यायच्या. तेव्हा आम्हा मुलींना तो आशिर्वाद आवडायचा नाही. 'लवकर म्हातारी हो' या आशीर्वादाचा  अर्थ आम्हाला मोठे झाल्यावर कळाला , म्हणजे 'सुखी आणि दीर्घायुष्य मिळो'. अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये तर आम्हा ९०% विद्यार्थ्यांना, १०० पैकी ९० पेक्षा जास्त मार्क्स होते, तसा क्लिष्ट असलेला हा विषय आमच्यासाठी वर्मा सरांमुळे मात्र खूप सोपा असायचा.

या सगळ्या गुरुजनांबरोबरच, आई वडील म्हणजे प्रथम गुरु! त्यांच्या विषयी लिहायला खरे तर शब्द अपुरे पडतील.

भाषण आणि निबंधात पहिले क्रमांक आले ते आईमुळेच. तिच्याकडे आजही शब्दांचे आणि ज्ञानाचे भांडार आहे. कोणतेही मराठी शब्द कोडे ती चुटकीसरशी सोडवते. 'कौन बनेगा करोडपती ' मालिकेतील प्रश्नांची उत्तरे ती सहज देत असते, महाभारत, रामायण हे तर अत्यंत बारकाव्यांसहित तोंडपाठ आहे. ती नेहमी नव्या नव्या पाककृतीही करत असते, स्मार्ट फोन योग्य पद्धतीने  वापरायला ती सहज शिकली आहे. स्मार्ट फोनचा वापर करून तिने शेतात येणाऱ्या रानभाज्याही  शोधल्यात . ज्या गावात, त्या काळी, ९८% मुलींचे बालविवाह व्हायचे, त्या काळात ‘आई’ नावाच्या शक्तीमुळे आम्ही शिक्षणासाठी बाहेर पडलो. आईचा उत्साह, स्वच्छतेची आवड, नवीन गोष्टी शिकण्याची आवड आणि जिद्द आम्हाला निरंतर प्रेरणा देत असते.

माणूस म्हणून आम्हाला घडवले ते आमच्या वडिलांनी. विचार कसा करावा हेच मुळी  त्यांनी शिकवले. त्यांनी आम्हाला कधी शाळेतला कोणताही विषय घरी शिकवला नाही, पण त्यांनी आम्हाला 'जीवन' नावाचा विषय उत्तम  शिकवला. त्यांच्या मोटारसायकलवर मागे बसून शाळेत जातांना आमचे मूल्य शिक्षण व्हायचे .मुलांना 'क्वालिटी टाईम ' देणे, हा शब्द तेव्हा आम्हाला कदाचित माहितही नव्हता, पण माझ्या वडिलांनी आयुष्यभर तो आचरणात आणला, आजही माहेरी गेल्यावर आम्ही असेच जाऊन येत नाही, त्यांच्या शिकवणीच्या शिदोरीची उजळणी करून येतो. ‘वडिलधार्यांना आदर द्यावा’, ‘परधन मृत्तिकेसमान असावे’, ‘कोणत्याही चांगल्या कामाची लाज न वाटू द्यावी’, ‘ऋण काढून सण करू नये’, ‘स्वाभिमानाने जगावे’ आणि ‘श्रीमंत जगणे म्हणजे सुसंस्कृत आयुष्य जगता येणे’ हे त्यांनी शिकवले. सुख दुःखाच्या काळात, नुसत्या त्यांच्या शब्दांनी आजही आभाळाएव्हढी हिम्मत येते. सुखात जमिनीवर राहतो, दुःखात डुबत नाही, आमचे वडील हेच आमच्या हृदयीचे आध्यात्म आहेत. वडिलांबरोबर पंचक्रोशीत कुठेही गेल्यावर, त्यांना मिळणारा आदर पाहून आमचे मन आकाश बनते आणि या मूल्यांचा वसा पुढे चालवायचा याची ग्वाही देते.

संत कबीरांनी म्हटल्याप्रमाणे,

गुरु समान दाता नहीं, याचक शिष समान।

तीन लोक की सम्पदा, सो गुरु दीन्ही दान॥

याचा अर्थ आहे, गुरुसारखा देणारा (दाता) नाही, आणि शिष्यासारखा याचक नाही. गुरु, त्रिलोकीच्या संपत्तीपेक्षाही अधिक मूल्यवान, असे ज्ञान-दान शिष्यांना देतात.

अशा समरसून शिकवणाऱ्या गुरुजनांमुळे आम्ही घडलो, त्यांना शत शत प्रणाम!



Saturday, August 1, 2020

Delivery

This is an incident when I started my business-engineering consultancy. When I decided to start, I shared the news with my friends/colleagues. Most of them were very prompt with offers for help. So Nima, one of my closest friend had suggested to go and meet Nitin Pai who is a Chartered Accountant. Nitin, Nima and I were ex-colleagues.

For the first few months, I registered the GST (Good and Services Tax) details on government website every month by myself. As there were no invoices initially, it was quite easy. I realised that after a few months I will be engrossed in technical things and that time I will not be able to keep track of GST. So I went to meet Nitin. Nitin and his wife Devashri, both CAs, were happy to support me. They had also recently started their own company providing Chartered Accountant services. Being from a middle class family, having limited funds, there is always a natural pressure to start earning regular income. So Nitin, Devashri and I were in the same boat. I knew Nitin to be a good, sincere and hard working person. While working for me, they never asked for money for the work they did. After invoicing started regularly, I paid them their fees.

When Nitin’s wife Devashri started to file the GST for my company every month, I used to send the invoice details to her. She would ask me for the OTP (One Time Password) which one receives on the phone/email) via phone message and file GST on every 19th or 20th of the month. We used to interact via email and for OTP via WhatsApp, since I became so busy that I couldn’t meet her. 

During one summer, I was at a site in Telangana. My cell would have network coverage for a very short time. So I informed her the time when I could send her the OTP. But even on 19th  I had not got the message from her. So I called her phone and came to know that she is being taken in the maternity room for delivery. I thought to myself that now the GST will not get filed and maybe we would need to pay the penalty.

But to my surprise, in the evening of the same day, I got a message from Devashri asking for the OTP. I was thrilled, knowing the fact that although she had just become a new mother who had given birth just a few hours before, had still managed to file my GST. She should have rested, whereas, she did it considering it important.

In the service industry, timely delivery and quality is very important.Being in a hospital,having become a new mother, Devashri kept her commitment intact. She managed to file  GST on the same day of her delivery!

This is a wonderful example for the people who say 'Women don’t perform'.

Marathi Translation (मराठी अनुवाद )👇

वितरण ( डिलिव्हरी )

जेव्हा मी माझा व्यवसाय-अभियांत्रिकी सल्लागार कंपनी  सुरू केली तेव्हाची  ही घटना आहे. जेव्हा मी कंपनी सुरु करण्याचे ठरविले, तेव्हा मी हे माझ्या जवळच्या मैत्रिणींना, सहकाऱ्यांना सांगितले, बहुतेकांनी मला काही मदत लागली तर सांग असे म्हणून माझा उत्साह वाढवला.माझी मैत्रीण निमाने मला  सल्ला दिला  की नितीन पै जो चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्याला जाऊन भेट. नितीन, निमा आणि मी आम्ही जुने सहकारी होतो.

पहिले  काही महिने  मी स्वत: दरमहा सरकारी वेबसाइटवर जीएसटी (गूड अँड सर्विसेस टॅक्स )भरत होते . सुरुवातीला फारसे इनव्हॉईसिंग (बील/चलन) नसल्याने हे सोपे होते. नंतर  माझ्या लक्षात आले कि  काही महिन्यांनंतर मी तांत्रिक गोष्टींमध्ये मग्न होईल, तेव्हा मी जीएसटीचा मागोवा ठेवू शकणार नाही. म्हणून मी नितीनला त्याच्या घरी भेटायला गेले. मला असे समजले नितीनची पत्नी देवश्रीहि चार्टर्ड अकाउंटंट आहे . त्या दोघांनी मला आनंदाने मदत करण्याचे मान्य केले . त्यांनीही  नुकतीच चार्टर्ड अकाउंटंट सेवा देणारी स्वतःची कंपनी देखील सुरू केली. मध्यमवर्गीय व्यक्ती असल्याने, मर्यादित निधी असल्याने, नियमित उत्पन्न मिळविण्यास नेहमीच नैसर्गिक दबाव असतो. म्हणजे  नितीन, देवश्री आणि मी एकाच बोटीमध्ये होतो. मी नितीनला खूप चांगला, प्रामाणिक आणि मेहनती माणूस म्हणून ओळखत होते . माझ्यासाठी काम करतांना त्यांनी कधीही केलेल्या कामाचे पैसे स्वतःहून मागितले नाहीत,व्यवस्थित इन्व्हॉसिंग सुरु झाल्यावर  मी त्यांची फी दिली.

नितीनची पत्नी, देवश्रीने जेव्हा  दरमहा माझ्या कंपनीसाठी जीएसटी दाखल करण्यास सुरवात केली.तेव्हा मी तिला बिलांचा तपशील पाठवत असे, ती मला ओटीपीसाठी (OTP:One Time Password) मेसेज पाठवत असे  आणि महिन्याच्या 19 वा 20 तारखेला जीएसटी दाखल करत असे. आम्ही ईमेलवर आणि ओटीपीसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर संवाद साधत होतो. त्यानंतर मी माझ्या कामात इतकी व्यस्त झाले  की मी त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटू शकले नाही. 

एका उन्हाळ्यात मी तेलंगणात साइटवर होते . मी फारच कमी वेळ फोनच्या रेन्जमध्ये असायचे. म्हणून देवश्रीला मी कोणत्या वेळेला तिला ओटीपी  पाठवू शकते ते सांगितले.पण 19 तारखेलाही मला तिच्याकडून काही मेसेज आला नाही.म्हणून मी तिला फोन केला आणि मला कळले की तिला प्रसूतीसाठी प्रसूती कक्षात नेले जात आहे. मला वाटले की आता त्या महिन्याचा जीएसटी दाखल होणार नाही आणि कदाचित आम्हाला दंड भरावा लागेल.

पण आश्चर्य म्हणजे त्याच दिवशी संध्याकाळी मला देवश्रीचा ओटीपीसाठी  विचारणारा मेसेज  आला. तिने  बाळाला जन्म दिल्यानंतर काही तासातच काम सुरु केले होते. खरे तर तिला तेव्हा विश्रांतीची गरज असेल, पण तिने महत्वाचे होते म्हणून वेळात वेळ काढून हे काम करून टाकले. 

सेवा उद्योगात वेळेवर वितरण (डिलिव्हरी) आणि गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची असते.प्रसूतीच्या दिवशी, दवाखान्यात  असतानाही देवश्रीने तिची  कामाबद्दलची निष्ठा अबाधित ठेवली. 

जे लोक म्हणतात 'स्रिया त्यांचे काम जबाबदारीने करू शकत नाहीत ' त्यांच्यासाठी हे उत्तम उदाहरण आहे. 

तुमचा अभिप्राय नक्की पाठवा : email id :preetiraskar@gmail.com