A few tragic incidents that occurred in the recent past and within a short span, left a very deep impact on me. The first incident was the suicide of a young girl studying in the tenth standard. She committed suicide in spite of scoring excellent marks, just because she scored less than her friend! The second incident was the suicide of a reputed industrialist due to recession and losses incurred during the Covid-19 outbreak. As it is, the news of suicides of farmers and protesters fills my mind with sadness, these incidents made me even sadder!
The first case of the girl who
committed suicide even after getting 88% marks is heart-wrenching! Such extreme
competition, so much stress! What did she accomplish by putting an end to her
own life and causing great sorrow to her near and dear ones?
Perhaps, this girl would have been successful
later in her life. She would have made a valuable contribution to her family
and society. Unfortunately, she couldn’t resist the negative emotions of envy
and comparison and her life became a misery! The poor girl was clueless that a
decision taken in a negative frame of mind is NEVER the right decision!
I think this is where ‘value education’
comes in. Life will never be enriched by inculcating fear, revenge, greed,
jealousy, hatred and competition. Nowadays, some schools do not openly disclose
a student’s test scores in order to avoid unnecessary comparison. The schools
also counsel young parents to avoid comparison. Going a step further, parents
encourage their child to not compare their results with anyone, but to work
hard and better their own scores. This is certainly a welcome change, hope that
it percolates everywhere!
I would like to quote examples from
Mahabharata- when the Kauravas and the Pandavas were preparing for battle,
Duryodhan told his siblings, “Prepare such that you will be superior to the
Pandavas”, whereas Yudhisthir told his siblings, “Prepare with all your might
and concentration, the journey of preparation is more important than the result”.
The epic Mahabharata with its
multitude events, the fractured relationships due to the immense hunger of the
Kauravas for wealth and power, the unsuccessful life of a virtuous mother like
Gandhari, what does all of this teach us? There is so much to learn from
mythology!
The second incident of an
industrialist who committed suicide due to recession, he who had created his
business from scratch, fills me with deep sorrow! With millions of people dying
from Covid, isn't it a blessing that we have survived? 'सिर सलामत तो पगडी पचास ! There is a wave of recession, industries
are shutting down. In order to survive economically, some businesses had to be closed,
extra costs had to be cut, austerity had to be practised. Many of us had to
write off a few years of progress.
Why should the one who had created his world from scratch be afraid to begin
all over again? If the brand had already evolved, would it be so difficult for
it to stand up again? Should the one who
has faced hardship before, be afraid to face hardship again?
In one of Birbal's stories, three
questions have the same answer:
-
Why did the roti burn? - Because it was not flipped.
-
Why did the horse stumble? - Because it was not flipped.
-
Why did the leaf rot? - Because it was not flipped.
Likewise, the immediate cause of both
these suicides that comes to mind could be that they did not express or share
their feelings.
Why don't you express yourself?
Why don't you tell someone your grief?
Is it because you feel insecure? Does a thought cross your mind, “What will
others think? Will they may make fun of me, consider me weak, won’t understand
me or take advantage of my vulnerabilities later?”
So how do you lessen the burden of
your grief? It is very simple:
· Share your feelings with any friend who is willing to listen to you. Cultivate at least one person in your life with whom you can share your happiness and sorrow. Approach a positive thinker or a motivational person for advice or sharing.
Foreigners travel to India to learn Pranayama.
Industrialists, famous artists, athletes, public leaders practise Pranayama,
then why don't we, ordinary people, learn / practise this divine knowledge which
is native to our own country?
Finally, inspired by Kusumagraj's
poetry, I would like to present the following poem:
No greed, no envy,
No fear, no revenge.
Stand strong like a tiger,
And fight like a fighter.
Constant comparison and anger, will that develop life?
Forest fires, smouldering fires, will a sapling survive?
With negativity, you will cry away your whole life like
Ashwatthama.
So, kick the fear, don't be engulfed in depression,
As happiness is transient, will sorrow remain constant?
So, 'Please do wake up, it's not too late',
Hiding behind
anger, don’t play a game of lust.
Life is a journey, of happiness and misery,
Life is a whirlwind of defeat and victory.
Live life like the wind, which follows its own path,
Follow your dreams and reach for the sky.
Don’t get lost in the fog of dejection,
Don't extinguish life in addiction.
Leave aside negative advice,
Fight on your own, conquer all the negative feelings.
Burn the poison in your mind,
Live life like the wind.
----------------------------------------------------------
* This icon shows the following references :
https://www.artofliving.org/in-en/wisdom/emotion
https://www.artofliving.org/in-en/wisdom/knowledge-sheets/5-secrets-to-happiness
References:
Ashwatthama – A character from Mahabharata who had the boon
of immortality, but was cursed to lead a life of suffering with painful wounds after
the epic war.
Acknowledgements:
Thank you my parents Aai , Papa, for
being light of my life!
Thank you my daughter Tanisha and husband Avinash for listening my fresh drafts patiently and giving feedbacks.
Thanks a lot, to people who read, your encouragement keeps me going ahead!
--------------------------------------------------------------------------------------------
Marathi Translation (मराठी अनुवाद )👇
आयुष्य जग
वाऱ्यासारखं सर्वव्यापी असलेलं!
अगदी थोड्या
अंतराने घडलेल्या या घटनांनी मला अस्वस्थ केले. पहिली घटना - दहावीच्या निकालानंतर उत्तम गुण पडूनही ,
मैत्रिणीपेक्षा कमी गुण मिळाले म्हणून आत्महत्या करणाऱ्या मुलीची आणि दुसरी घटना एका प्रथितयश उद्योगपतीची जगव्यापी करोना आजारामूळे, आलेल्या मंदीमुळे केलेली
आत्महत्त्या . शेतकऱ्यांच्या , आंदोलकांच्या आत्महत्यांच्या नेहमीच येणाऱ्या बातमीने
तर मन दुःखाने भरून जाते.
पहिली घटना-
वर्षभर चांगला अभ्यास करून ८८% गुण मिळवूनही , केवळ मैत्रिणीपेक्षा कमी गुण मिळाले
म्हणून आत्महत्या करणाऱ्या मुलीची. इतकी टोकाची स्पर्धा - इतका ताण !, आई वडिलांना
, नातेवाईकांना अतोनात दुःख देऊन, स्वतःचेच आयुष्य संपवून तिने काय साधले ? कदाचित
हि मुलगी पुढे खूप समर्थपणे पायावर उभी राहिली असती . आपल्या कुटुंबासाठी , परिवारासाठी
आणि समाजासाठी तिने मोलाचे योगदान दिले असते . पण तात्पुरत्या भावनांच्या आवेगाला ती
थांबवू शकली नाही. ज्या तुलनेमुळे, हेव्यामुळे ,जीवन खरे तर नरक बनते
तेच तिने महत्वाचे मानले . चुकीच्या किंवा नकारात्मक कारणांसाठी घेतलेला निर्णय कध्धीच बरोबर नसतो हे तिला बिचारीला माहीतच नसावे .
मला वाटते इथेच
मूल्य शिक्षण येते. भीती , सूड , लोभ , मत्सर , द्वेष आणि स्पर्धा शिकवणारे शिक्षण
कधीही जीवन घडवत नाहीत . आज काही शाळांमध्ये ही जाणीव ठेवून परीक्षेचे गुण उघडपणे सगळ्यांना
सांगत नाहीत. मुले लहान असतांना, पालकांचेही समुपदेशन केले जाते . मग ते हि आयुष्यभर
'याच्यापेक्षा किंवा याच्यासारखे चांगले गुण
मिळव असे न सांगता, तुझे गुण पुढच्या परीक्षेला, ‘आहे त्यापेक्षा’ वाढवं’, असेच सांगतात
. हा बदल नक्कीच खूप स्वागतार्ह आहे फक्त तो सर्व शाळांमध्ये पोहोचायला हवा.
मला अशा वेळी
महाभारताचा दाखला द्यावासा वाटतो , कौरव आणि पांडव यांच्या स्पर्धेची तयारी चालू असतांना, दुर्योधन आपल्या भावंडांना सांगतो ,' तुम्ही पांडवांपेक्षा
वरचढ व्हाल अशी तयारी करा'., तर युधिष्ठिर
आपल्या भावंडांना सांगतो, ' तुम्ही सर्वोत्तम अशी तयारी करा, आपण तयारी किती
न्यायाने आणि एकाग्रतेने करतो ते महत्वाचे , तो प्रवास महत्वाचा'.
महाभारत हा ग्रंथ , त्यातील घटना , कौरवांनी
सत्ता आणि संपत्तीच्या हव्यासापोटी केलेला नात्यांचा छेद , गांधारीसारख्या पुण्यशील
मातेचे अपयशी जीवन काय शिकवते? आपण आपल्याच इतिहासातून, पौराणिक कथांतून का काही शिकत
नाही?
बिरबलाच्या
एका गोष्टीच्या कोड्यात, तीन प्रश्नांचे एकच
उत्तर दिले आहे :
-
पोळी का जळाली - कारण फिरवली नाही.
-घोडा
का अडला-कारण फिरवला नाही .
-पाने
का सडली- कारण फिरवली नाही .
तसे या दोन्ही
घटनांचे तात्कालिक कारणही एकच आहे, ‘ ते व्यक्त झाले नाहीत’.
का व्यक्त होत
नाही आपण ?
आपण आपले दुःख
का कोणाला सांगत नाही कारण आपल्याला असुरक्षित वाटते. म्हणजे असे वाटते कि समोरचा काय विचार करेल? कदाचित आपली चेष्टा करतील,
कमकुवत मानतील, कमी समजतील किंवा नंतर फायदा उठवतील .
मग कसे कोणाला
आपले दुःख सांगायचे? खूप सोपे आहे:
· तुमचे सुख-दुःख जो ऐकू शकतो अशा , सकारात्मक विचार असलेल्या तुमच्या कोणत्याही मित्र किंवा मैत्रिणीला तुम्ही तुमचे दुःख सांगू शकता. आयष्यात एक माणूस तरी असा कमवा कि तुम्ही त्याला सर्व सुख-दुःख सांगू शकाल. जो जास्तीत जास्त सकारात्मक विचार करतो तो माणूस सल्ला देण्यास योग्य समजावा.
· सहन करण्यापेक्षा, दुःख सांगितल्याने ते कमी होते , बऱ्याचदा त्यातून मार्गही निघतो .
· राग , मत्सर ,द्वेष ,खुन्नस , सूड ,आळस ,दुःख ,एकटेपणा ,भीती इ. नकारात्मक भावना आहेत. आपल्या मनात या भावना असतांना कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नये. नकारात्मक भावनेने घेतलेले निर्णय कधीही समाजात सन्मान किंवा जीवनात आनंद देत नाहीत.
· महत्वाचे निर्णय नेहमी ,मन शांत आणि सकारात्मक असतांना, सारासार विचार करून घ्यावेत.
· प्रेम, निर्मळपणा,आदर ,आनंद,आशा , उत्सुकता, उत्साह, कृतज्ञता,क्षमा या सकारात्मक भावना आहेत.
· प्रत्येक माणूस वेगळा असतो , त्याचे व्यक्तिमत्व , त्याची जडण -घडण वेगळी असते , असा विचार केल्यास,तुलना आणि मत्सर येतच नाही . पण तरीही जिथे सर्वथा अपमान होतो , अवहेलना होते, टोकाची तुलना असते , तिथे परिस्थिती सुधारे पर्यंत नका जाऊ . प्रत्येक नात्याचे आपल्या आयुष्यात काहीतरी योगदान असते , एकमेकांविषयी आदर हा हवाच .
· सकारात्मक विचार सतत मनात येत असतील तर आपल्याकडून सकारात्मक काम होते आणि आपोआप जीवन अतिशय सुंदर सकारात्मक होते .
· प्राणायाम, ध्यान या गोष्टी केल्याने आपण कोणत्याही प्रसंगाला अतिशय यशस्वीपणे सामोरे जाऊ शकतो . हे टेक्निकली (तांत्रिकदृष्ट्या) सिद्ध झाले आहे .कारण प्राणायामने आपल्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, आपण जास्तीत जास्त पॉजिटिव्हली (सकारात्मक) विचार करू लागतो. मोठमोठ्या कंपन्या आपल्या अधिकाऱ्यांना प्राणायाम , ध्यान याचे प्रशिक्षण देतात कारण त्याने निर्णयक्षमता वाढते,सकारात्मकता वाढते . (*)
परदेशी लोक आपल्या देशात येऊन प्राणायाम शिकतात. उद्योगपती, प्रसिद्ध कलाकार, खेळाडू, लोकनेते प्राणायाम करतात , मग आपल्याच देशातले हे दिव्य ज्ञान -प्राणायाम , ध्यानधारणा , योगासने आपण सामान्य लोकांनी का नाही शिकायचे आणि करायचे ?
शेवटी, कुसुमाग्रजांच्या
कवितेतून प्रेरित होऊन , मला खालील कविता सादर करायला आवडेल :
नको लोभ, नको हेवा,
नको भीती,
नको सूड.
वाघासारखा
हिंमतीने उभा राहा,
संकटाच्या
नजरेत एकदा नजर बांधून पहा .
याच्याशी तुलना,त्याच्यावर राग, आयुष्य घडवतील काय?
वनातील वणवा,
धुमसणारी आग, रोपटे जगवतील काय ?
अश्वत्थाम्यासारखा
बसशील आयुष्यभर रडत,
भीतीला घाल
लाथ, नको बसू झुरत ,
सुख गेले
तसे, दुःख तरी राहील काय?
म्हणून म्हणते
, 'जागे व्हा, अजून गेली नाही वेळ,
रागाच्या
मागे लपून, नको हव्यासाचा खेळ.
आयुष्य म्हणजे
प्रवास, सुख-दुःखाच्या वळणाचा .
आयुष्य म्हणजे
श्रावण मास, यश-अपयशाच्या ऊन-पावसाचा.
आयुष्य
जग वाऱ्यासारखं, सर्वव्यापी असलेलं .
पाण्याचीही
वाफ होऊन, नभापर्यंत पोहोचलेलं .
निराशेच्या
धुक्यामध्ये हरवू नकोस.
व्यसनाच्या जंजाळात आयुष्य विझवू नकोस
.
स्वतःशीच लढ , ठोकरून सारे डाव .
जाळून टाक
किल्मिष सारं मनामध्ये साचलेलं ,
आयुष्य जग
वाऱ्यासारखं सर्वव्यापी असलेलं .
* हे चिन्ह
खालील संदर्भ दाखवते , नक्की वाचा :
https://www.artofliving.org/in-mr/wisdom/dealing-with-emotions
https://www.artofliving.org/in-mr/wisdom/five-secrets-of-success
या ब्लॉगची ऑडियो क्लिप ऐकण्यासाठी खालील लिंक वर जा:
https://soundcloud.com/preeti-raskar/p26dmfcjp9cw
No comments:
Post a Comment